राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल बदनामीकारक चित्रफीत अपलोड केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकरला अटक

Spread the love

राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल बदनामीकारक चित्रफीत अपलोड केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकरला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल बदनामीकारक चित्रफीत समाजमाध्यमावर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात तिरोडकर यांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांनी काही बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon