वृत्तांगणासाठी गेलेल्या आज तकच्या पत्रकाराचं बीडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Spread the love

वृत्तांगणासाठी गेलेल्या आज तकच्या पत्रकाराचं बीडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले.देशातील ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघात लाईव्ह वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडलीय. मुंबईतून बीडमध्ये आज तक चे पत्रकार वैभव कनगुटकर हे वार्तांकनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पत्रकार वैभव विजय कनगुटकर हे मुंबईतून बीड लोकसभा मतदारसंघात वार्तांकनासाठी गेले होते. तिथं लाइव्ह रिपोर्टिंग झाल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ४८ वर्षीय वैभव कनगुटकर यांचं बीडच्या अंबाजोगाईत वार्तांकन सुरू होतं. वैभव यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon