धक्कादायक ! पुण्यातील कॉलेज हॉस्टेलमध्ये कपडे बदलतानाचे व्हिडिओ व्हायरल; दोघांना घेतले ताब्यात

Spread the love

धक्कादायक ! पुण्यातील कॉलेज हॉस्टेलमध्ये कपडे बदलतानाचे व्हिडिओ व्हायरल; दोघांना घेतले ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण सध्या तंतोतंत लागू पडत आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ तरुणीने तिच्या मित्रांना पाठवण्यात आल्याच्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

सदर प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्या गिरीश काळे आणि  विनीत सुराणा या दोन जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चे चोरून व्हिडिओ फोटो काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाजीनगरयेथील या शासकीय महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही प्रशासन गप्प राहिल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोपी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी कॉलेज व्यवस्थापनाची व्यक्ती कोण आहे, याची चौकशी करून त्याच्यावरही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. सांस्कृतिक पुण्यात अशा घडत असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon