धक्कादायक ! नवी मुंबईत पतीने फरशी आणि काठीने पत्नीचं डोकं ठेचत घेतला जीव

Spread the love

धक्कादायक ! नवी मुंबईत पतीने फरशी आणि काठीने पत्नीचं डोकं ठेचत घेतला जीव

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाइतकंच विश्वासालाही महत्त्व आहे. जोपर्यंत या दोन्ही गोष्टी आहेत, तोपर्यंत संसार अगदी आनंदात सुरू असतो. मात्र, यातील एकही गोष्ट संपली तर कधी हे नातंच तुटण्याच्या मार्गावर पोहोचतं. तर, कधीकधी यापेक्षाही भयानक परिणाम होतात. अशीच एक घटना आता नवी मुंबईतून समोर आली आहे. ज्यात एका पतीने अतिशय धक्कादायक कांड केलं. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दारावे गावात घडली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर आरोपीची चौकशीही करण्यात आली.

पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेले फरशीचे तुकडे आणि चाकूही सापडले आहेत. यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपासाचा आग्रह धरला आणि उस्मानला अटक केली. चौकशीत त्याने सांगितलं की, पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने रागात पत्नीच्या डोक्यात वार केला होता. त्याने काठीने वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon