कैश फॉर इलेक्शन चा खेळ सुरुच; पोलिसांनी पवई परिसरात एका व्हॅनमधून ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

Spread the love

कैश फॉर इलेक्शन चा खेळ सुरुच; पोलिसांनी पवई परिसरात एका व्हॅनमधून ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिसांनी पवई परिसरात नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाखांची कॅश पकडली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. पवई पोलिसांचा नाकाबंदी दरम्यान कॅश व्हॅन गाडी मधून ४ कोटी ७० लाख रुपया घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती.या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता पवई पोलिसांनी ४ कोटी ७० लाख रुपये कॅश व्हॅन मधून जप्त केली आहे.

पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी ला आपल्या ताब्यात घेऊन हा रोकड कुठून आला आणि एटीएम मध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का ? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon