गोंदियातील गोरेगाव तहसिलदार भदाणेसह ५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

गोंदियातील गोरेगाव तहसिलदार भदाणेसह ५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

गोंदिया – जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी घटना घडली असून गोरेगाव तहसिलदार के.के.भदाणेसह याच कार्यालयातील नायब तहसिलदार व कर्मचारी यांच्यासह सुमारे ५ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

वाळू प्रकरणात कारवाई टाळण्याकरीता लाचेची मागणी करण्यात आल्याने सदर पिडीत वाळू व्यवसायिकांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत तहसिलदार के.के.भदाणे,नायब तहसिलदार नागपूरे,मंडळ अधिकारी संतोष मेश्राम,मारोती केंद्र,तलाठी बिसेन व संगणक ऑपरेटर गणवीर यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

गोरेगाव तहसिल कार्यालयात आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon