ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटो मध्ये मतदान केंद्रावर चाकणकर या आरती करताना व्हिडीओ व्हायरल झाला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर मतदान सुरु होण्यापूर्वी त्या औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केली
मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यानंतर चाकणकर यांच्याविरोधात पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आता रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीलची पुजा करत आचारसंहितेचे उल्लंघन केलं आहे. याप्रकरणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती पुणे पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.