भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल – उद्धव ठाकरे

Spread the love

भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल – उद्धव ठाकरे

ऐरोलीच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका; इंडियाचं सरकार आल्यावर ८० कोटी लोकांना रोजगाराची हमी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – काश्मीर मध्ये आजही हल्ले होत आहेत, मग तुम्ही १० वर्ष काय खुर्च्या उबावताय. अहो, मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती देखील आता करत नाही, मात्र तेव्हा तिथे हील मध्ये तुम्ही फोटोग्राफी करत होतात. आता मोदीजी काय करताय? महागाई वर बोलताना दिसतात का? रोजगारावर बोलतात का? तर आता ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करताय. आमचं सरकार आल्यावर ८० कोटी लोकांना काम देणार आहोत. आता पुन्हा त्यांनी नवी जाहिरात काढली आहे, की तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा? भारतात की पाकिस्तानात? भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, मोदीजी तुम्ही हरले तर भारतात जल्लोष होणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राजन केवळ मलाच नाही, तर मला खात्री आहे, बाळासाहेबांना आणि धर्मवीर यांनी देखील तुमचा अभिमान वाटत असेल. कारण ठाण्याचे शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे. पण काहींना आता मस्ती आली आहे, ती मस्ती उतरवायला मी इथे आलो आहे. सभेला गर्दी होत आहे, काल तर धाराशिवला अंगावर रोमांच येणारी सभा झाल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

आजही त्यांचे संदेश येतात की ये तुला सोडून देतो, मात्र मढवी तुरुंगात आहेत. संजय राऊत पण तसेच आहेत, टाका म्हणाले तुरुंगात, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. टिळकांनी तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारले होते, मात्र आत्ताच्या सरकारला डोके नाहीच हे खोके सरकार आहे. मोदीजी तुम्ही विसरले असाल, कालच्या पर्वाच्या सभेत त्यांनी माझे कौतुक केले. तुम्ही विसरले असेल की माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले होते, तेव्हाचे तुमचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मला फोन देखील केला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राजकारणात भाजपला मुले होत नाहीत, तर त्याचात माझा दोष काय?, मी त्यांना भाकड जनता पक्ष यासाठी म्हणतो कारण त्यांना राजकारणात मुले होत नाहीत, त्यांना आमची मुले कढेवर घेऊन फुरवे लागतंय. मी आता हिशोब लावतोय, ७० हजार कोटींचा घोटाळा करणारा जर उपमुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्र्यांचा घोटाळा किती असेल? राजन विचारे यांची ही कामे आहेत, हे मलाही उचलता येणार नाही एवढं मोठे पुस्तक असल्याचं म्हणत ठाकरेंनी कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon