बीडमध्ये चंदन तस्करी, केज पोलीस ठाणे हद्दीत दोन कोटी रुपयांचे चंदन जप्त; आरोपी बालाजी फरार…

Spread the love

बीडमध्ये चंदन तस्करी, केज पोलीस ठाणे हद्दीत दोन कोटी रुपयांचे चंदन जप्त; आरोपी बालाजी फरार…

पोलीस महानगर नेटवर्क

बीड – जिल्ह्यात मोठया प्रमाणावर चंदनाची तस्करी सुरू आहे.असाच एक प्रकार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक मोठा टेम्पो केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतला असुन, या टेम्पो मध्ये तब्बल २ कोटी १८ लाख रुपये किंमतीचे सुमारे सव्वा टन चंदन जप्त करण्यात आले आहे. या टेम्पोच्या चालक वाहकाला पोलिसांनी अटक केली असून, हे चंदन बजरंग सोनवणे यांचे निकटवर्तीय व शरद पवार गटाचे नगरसेवक बालाजी जाधव यांचे असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट झाले आहे. बालाजी जाधव हा केज नगर पंचायतमध्ये नगरसेवक असून, तो बीड लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा निकटचा सहकारी आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील तो सक्रिय सहभागी असून, बजरंग सोवणने यांच्या घरी देखील जाधवची उठबस होती.

दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले चंदन व टेम्पो सध्या केज पोलिसांच्या ताब्यात असून, सदर प्रकरणी वन अधिनियम व भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे. पोलिसांनी १ हजार २३५ किलो चंदनाच्या लाकडासह आयशर टेंपो असा २ कोटी १८ लाख ३१  हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीड गुन्हे शाखा व केज पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

बीड गुन्हे शाखेले खबऱ्याकडून चंदन तस्करीची माहिती मिळाली होती. चंदनाची लाकडे घेऊन एक आयशर टेंपो केजकडून धारुरकडे असल्याचे समजल्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलिसांनी रविवारी (५ मे) पहाटे साडे चार ते सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान केज-धारुर महामार्गावर सापळा रचला. यावेळी आयशर टेंपो (एमएच२४ एयु ९३८३) च्या हालचाली संशसास्पद वाटल्याने त्याला थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी टेंपोमध्ये चंदनाच्या झाडाच्या गाभ्याने भरलेल्या ६० गोण्या आढळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon