टेम्पोच्या धडकेत दाेन ठार, तर पाच गंभीर जखमी; चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या दिले ताब्यात

Spread the love

टेम्पोच्या धडकेत दाेन ठार, तर पाच गंभीर जखमी; चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या दिले ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी – वाडा महामार्गावर भरधाव टेम्पो चालकाने तीन बाईक व रस्त्यावरील चालणाऱ्या नागरिकांना धडक देत पलायन केले. दरम्यान नेहरोली गावाजवळ संबंधित टेम्पो चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघात दाेन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. टेम्पो चालक हा मनोरहून वाडा मार्गे भिवंडीला निघाला हाेता. वाडा भिवंडी महामार्गावर गांद्रे गावा जवळ टेम्पो चालकाने पहिल्या दुचाकीला धडक दिली.

त्यानंतर त्याने टेम्पो वेगात पुढे नेत पळून जाण्याच्या प्रयत्नांच याच महामार्गावर शिरिषपाडा जवळ पायी जाणाऱ्यांना धडक दिली. तेथून त्याने टेम्पाे पुढे दामटत भिवंडीच्या दिशेने पळाला. त्याच्या पुढे त्याने पुन्हा नेहरोली गावा जवळ दुचाकीस्वाराला धडक दिली. तेथे पळून जाण्याचा प्रयत्न त्याचा फसला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon