भिवंडीच्या राजकारणात रिव्हर्स स्वीप; राजीनाम्यानंतर काही तासांतच आमदार रईस शेख यांची घरवापसी

Spread the love

भिवंडीच्या राजकारणात रिव्हर्स स्वीप; राजीनाम्यानंतर काही तासांतच आमदार रईस शेख यांची घरवापसी

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – राजीनाम्यानंतर काही तासांतच भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भिवंडीच्या लोकांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेत असल्याचं रईस शेख यांनी जाहीर केलं आहे. भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपला राजीनामा मागे घेताना रईस शेख यांनी पक्षातील दलालांवर निशाणा साधला आणि त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. हे दलाल पक्ष कमजोर करत असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे. रईस शेख यांचा राजीनामा हा महाविकास आघाडीसाठी भिवंडीत एक झटका मनाला जात होता. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात मैदानात आहेत

राज्यातील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा २० एप्रिल रोजी दिला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे अखिलेश यादव यांच्यासाह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. रईस शेख समाजवादी पक्षाचे भिंवडीचे आमदार आहेत. रईस शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षातल्या अंतर्गत कलहामुळं राजीनामा दिला असल्याचं सांगितलं होतं. राजीनामा दिल्यानंतर रईस शेख लवकरच अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण रईस शेख यांनी राजीनामा मागे घेतला आहे.

रईस शेख भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते नगरपरिषद आणि समाजवादी पक्षाचे गटनेते देखील राहिले आहेत. रईस शेख यांनी २०१२ मध्ये गोवंडी आणि २०१७ मध्ये नागपाडा येथून बीएमसी निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मुंबई मिररच्या सर्वेक्षणानुसार रईस शेख मुंबईतील टॉप १० नगरसेवकांमध्ये सुमार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon