राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Spread the love

राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

बिटकॉईन प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीचेही मालमत्तेवर टाच

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यांची एकूण ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने राज कुंद्रा याची कोट्यावधींची मालमत्ता जप्त केला आहे. बीटकॉइन प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून राज कुंद्राच्या अडचणी थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत राज कुंद्रावर जप्तीची कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये ईडीने शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील रहिवाशी फ्लॅट तसंच कुंद्रा याच्या नावावर असलेला पुण्यातील बंगला आणि शेअर्स जप्त केले आहेत.

गुरूवारची राज कुंद्रावर ही कारवाई ईडीने बिटकॉईन घोटाळा प्रकरणात केली आहे. हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटी रूपयांचा असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामध्ये ईडीने याआधी २०१८ मध्ये समन्स बजावले होते. २०१८ मध्ये या बिटकॉईन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती.

हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. बिटकॉईनच्या एका संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. हे प्रकरण राज कुंद्राशी संबंधित आहे. त्यामुळेच त्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. आयपीएलच्या सट्टेबाजीतही यापूर्वी राज कुंद्राचं नाव आलं होतं. आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे सहमालक होते. या प्रकरणामध्ये राज कुंद्राची चौकशी देखील झाली होती. त्यावेळी त्याने फिक्सिंगचा गुन्हा कबुल केलेला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करत राजस्थानवर दोन वर्षाचा बॅन लावला गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon