क्रिकेटर हार्दिक पांड्याची ४ कोटींची फसवणूक, आरोपी सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

क्रिकेटर हार्दिक पांड्याची ४ कोटींची फसवणूक, आरोपी सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वैभव हा आरोपी पंड्या ब्रदर्सचा सावत्र भाऊ आहे. हे प्रकरण २०२१ च्या दरम्यान घडले आहे जेव्हा आरोपी वैभवने पंड्या ब्रदर्ससोबत पॉलिमर व्यवसायाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीत हार्दिक आणि कृणालची ४०-४० टक्के आणि वैभवची २० टक्के हिस्सेदारी होती.

भागीदारीच्या अटींनुसार कंपनीला मिळणारा नफा तिघांमध्ये विभागायचा होता. कंपनीच्या नफ्याची रक्कम पंड्या ब्रदर्सला देण्याऐवजी आरोपी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून नफ्याची रक्कम त्यात वर्ग केली. त्यामुळे पंड्या ब्रदर्सचे सुमारे ४.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हार्दिकच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने वैभव पांड्याला अटक केली आहे. आरोपी वैभवला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon