जादा नफ्याचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

जादा नफ्याचे आमिष दाखवून ठाण्यातील महिलेची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – राज्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी जनजागृती करून देखील नागरिक खोट्या आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. ठिकठिकाणी जादा रक्कम मिळेल याचं आमिष दाखवून लुबाडणूक केली जात आहे. ऑनलाईन घोटाळा, फसवणूक भामट्याकडून सुरुच आहे. अशीच एक घटना ठाण्यातील कोलशेत परिसरात घडली आहे. लोढा, कोलशेत रोड येथे राहणाऱ्या एका महिलेला मोबाईलवर कॉल करून सांगितले की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल. अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून तब्बल ४ लाख ४३ हजार ३०८ रुपये अँपद्वारे ऑनलाईन पाठविण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यवहार दि.३ फेब्रुवारी, २०२४ ते दि.७, मार्च, २०२४ या दरम्यान झाला आहे.

कोलशेत रोड वरील अमारा येथील लोढा या परिसरात राहणाऱ्या (३७) वर्षीय महिलेला अनोळखी मोबाईलधारक इसमाने मोबाईल कॉल करून शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी महिलेस आरोपीने स्टॉक मार्केट इलाइट २२, या व्हाटसअँपद्वारे ग्रुप मध्ये ऍड करून दोन वेबसाईट पाठवल्या. त्यानंतर सदर वेबसाईटमार्फत शेअर्स ट्रेडिंग केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवून ४,८४,६३७/- रु. रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास सांगून ४१,३२९/- रुपये परत करून, उर्वरित एकूण ४,४३,३०८/- रुपये रक्कम परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. सदर प्रकाराबाबत फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. || ३२५ /२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) सह भा.द. वि. कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon