जादा परताव्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील इसमाची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

Spread the love

जादा परताव्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील इसमाची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

डॉबिवली – राज्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी जनजागृती करून देखील नागरिक खोट्या आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. अशीच एक घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. डोंबिवली मध्ये एका व्यक्तीला व्हाट्सअप मेसेज द्वारे सांगण्यात आले की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळून देईल. अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून तब्बल ६ लाख ८० हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

श्याम विनायक देशपांडे (४८ वर्ष), पाथार्ली रोड, डोंबिवली पूर्व या व्यापाऱ्याला व्हाट्सअप वर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मेसेज आला होता. देशपांडे यांनी एका शेअर मार्केट व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखविले होते.‌ पहिला त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने ६ लाख ८० हजार रुपये ऑनलाईन घेऊन त्याच्यावर अधिक नफा मिळवून देतो असे सांगण्यात आले होते. परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक अधिकचा परतावा न आल्याने फिर्यादी देशपांडे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर देशपांडे यांनी थेट टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क),६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon