राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सरव्यवस्थापक, २० लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सरव्यवस्थापक, २० लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील नागपुरात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) चे महाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक अरविंद काळे याला अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका खासगी कंपनीला महामार्गाच्या कामाचे कंत्राट दिले होते. या कंपनीने वेळेवर काम पूर्ण केले. कामाची बिले मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे पाठवण्यात आले. कंपनीणे दिलेली बिले प्राधिकरणाने जमा करून घेतले. या दरम्यान, कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले. या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेत, त्यांना बिले मंजूर करण्यासंदर्भात मागणी केली. त्यांची बिले ही लवकरच मंजूर केले जातील असे आश्वासन काळे यांनी दिले. मात्र, दोन महीने उलटूनही पैसे जमा न झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काळे यांची भेट घेत बिलसंदर्भात विचारले. काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील ११ कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नाही असे थेट सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पाचे संचालक काळे आणि मध्य प्रदेशातील हरदामधील प्रकल्पाचे संचालक साहू, भोपाळमधील बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अनिल बन्सल, कुणाल बन्सल आणि कंपनीचे कर्मचारी छतर सिंह लोधी आणि सी कृष्णा यांना अटक केली. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, सीबीआयने रविवारी भोपाळ आणि नागपूरमध्ये अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासह पाच ठिकाणी छापा टाकला. २० लाख रुपयांच्या लाचेच्या रक्कमेसह १.१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon