बहिणीसाठी तो बनला तोतया पोलीस ; कॉपी पुरवताना पकडला गेला…

Spread the love

बहिणीसाठी तो बनला तोतया पोलीस ; कॉपी पुरवताना पकडला गेला…

अकोला – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. मात्र तरीदेखील काही कॉपी बहाद्दरांनी नवीन आयडिया शोधून कॉपी केल्याचे समोर आले आहे. असाच एक कॉपीचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल या १२ वीच्या परीक्षा केंद्रावर घडला.

अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल येथे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेदरम्यान काल, २१ फेब्रुवारीला चक्क पोलिसाचा गणवेश धारण करून केंद्रावर रुबाबात कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचे बिंग सॅल्यूट करतानाच फुटले आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (वय २४, राहणार पांगरा बंदी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे

पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तोतया पोलीस असलेल्या अनुपमला अधिक विचारपुस केली असता, हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या जवळ इंग्रजी विषयाची चिटोरे सापडून आले आणि सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अनुपम विरोधात ४१७, ४१९, १७०, १७१ आणि अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon