कल्याण डोंबिवली परिसरात घरांचे स्वप्न साकारण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या – विकासक रवी पाटील

Spread the love

कल्याण डोंबिवली परिसरात घरांचे स्वप्न साकारण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या – विकासक रवी पाटील

कल्याण – क्रेडाई एस.सी. एच.आय.कल्याण डोंबिवली युनिटतर्फे गेली १२ वर्ष सातत्याने लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून दि.८ फेब्रुवारी, २०२४ ते ११ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत १३ वे घरकुल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामुळे लोकांना आपल्या पसंतीचे घर घेता येईल. या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, ठाणे, शिळफाटा रोड या परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे पाहण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहेत. यामध्ये १६ लाखांपासून २ करोड पर्यंत घरे उपलब्ध असतील. प्रायोजक म्हणून थरवाणी इन्फ्रास्ट्रक्चर, अजमेरा समूह, मंगेशी समूह, पॅराडाईज समूह, मेहता समूह, द हाऊस ऑफ चव्हाण व बँकिंग भागीदार म्हणून एसबीआय होम लोन लाभणार आहेत.

सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस.सी.एच.आय.कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. या प्रदर्शनात ४० हून अधिक विकासक तर १५० पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली लोकांना बघता येणार आहेत. मागील अनेक वर्षांचा अंदाज बघता या वर्षी २५ हजारांहून अधिक नागरिक प्रदर्शनाला भेट देतील असे आयोजकांना वाटते. जागेवर ताबडतोब नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रक्कमेमध्ये सवलत मिळणार आहे तसेच प्रत्येक तासागणिक लकी ड्रा काढण्यात येणार आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी हिच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी प्रदर्शना भेट देणार असल्याचे एमसीएचआय क्रेडाई युनिट चे रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon