दिवा परिसरात लाखोंची घरफोडी ; चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू

Spread the love

दिवा परिसरात लाखोंची घरफोडी ; चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू

ठाणे – कळवा, दिवा परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. साबेगाव, दिवा पूर्व परिसरातील राहत्या घरातील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने त्यावाटे आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, विवो कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ४,००,०००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.

याबाबत फिर्यादी सुदाम लक्ष्मण भोईर (५९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. ३९३/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर हे़ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon