कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भरली विद्यार्थ्यांची शाळा

Spread the love

कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भरली विद्यार्थ्यांची शाळा

वपोनी राजेश शिरसाट यांचा स्तुत्य उपक्रम

कल्याण – पोलीस दिनाचे औचित्य साधून पोलीस रेझिंग सप्ताह-२०२४ अंतर्गत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, पोलिसांकडील हत्यारं यांची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून शाळा भरवली गेली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्लिनाथ डोके यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन कामकाज समजावून सांगितले तसेच वापरात येणारी हत्यारं कशी वापरली जातात याची माहिती देण्यात आली. यामध्ये आयडियल इंग्लिश स्कुल, द्वारका विद्यालय व माता रखमाबाई गायकवाड स्कुल यामधील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon