कल्याणमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर परिमंडळ-३ च्या पथकाचा छापा

Spread the love

कल्याणमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर परिमंडळ-३ च्या पथकाचा छापा

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ ऍक्शन मोडवर

कल्याण – परिमंडळ -३ च्या वतीने कल्याणमध्ये ऑनलाईन लॉटरी जुगार चालणाऱ्या तीन ठिकाणीं छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोल्डन पार्क परिसरात चालणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. याठिकाणी हा जुगार अड्डा चालविणाऱ्या संदीप गायकवाड, कार्तिक तावडे,प्रवीण मुंडे व इतर ५ जणांवर भादंवि कलम ४२० व जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसरा छापा कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासुम बेकरी जवळ चालणाऱ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली, या धाडीत ऑनलाईन साठी लागणार साहित्य जप्त करण्यात आले व दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिसरी धाड महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेतूरकर पाडा परिसरात टाकून पोलिसांनी तेथील साहित्य व मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांचा सूत्रधार संदीप गायकवाड असून त्याच्या पाठीमागे एका राजकीय नेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अजून कुणालाही अटक झाली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात ऑनलाईन जुगार, लॉटरी यावर त्वरित बंदी घालण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, मात्र असे असताना राज्यात अनेक ऑनलाईन जुगार राजरोसपणे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon