मुंबई विमानतळावर विदेशी महिलेकडून ९ कोटींचे कोकेन जप्त; महिलेला अटक

Spread the love

मुंबई विमानतळावर विदेशी महिलेकडून ९ कोटींचे कोकेन जप्त; महिलेला अटक

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महिलेच्या डोक्यावर लावलेल्या विग, तसेच अंतर्वस्त्रातून ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

ही महिला युगांडा देशातील असल्याची माहिती आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास डीआरआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महिलेने ज्या शिताफीने हे कोकेन लपवले होते, ते पाहून महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी देखील चकित झाले होते. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे डीआरआकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. यावेळी या महिलेने डोक्याला विग लावल्याचे आढळून आले. तो पाहून महसूल गुप्तचर विभागाला संशय आल्याने त्यांनी त्या महिलेची चौकशी केली. त्यानंतर त्या महिलेने लावलेल्या विगमध्ये प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेल्या कोकेनच्या छोट्या छोट्या पुड्या आढळून आल्या. या पुड्यांमध्ये ८९० ग्रॅम कोकेन होते. हे ड्रग्स महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले असून त्याची किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. त्या महिलेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon