डॉकयार्ड रोड येथील गोळीबारची घटना; हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

डॉकयार्ड रोड येथील गोळीबारची घटना; हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई : भायखळा परिसरातील डॉकयार्ड रोड येथे एका व्यक्तीवर गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ३०८, ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(अ), १३५ तसेच शस्त्र अधिनियम कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता डॉकयार्ड रोड येथील मिनाक्षी अपार्टमेंट, माझगाव परिसरात समीर मोहम्मद असीफ खान (वय ४१) यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला होता. या हल्ल्यात खान यांचा जीव थोडक्यात बचावला.

घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान आरोपी क्रमांक १ (वय ३०) याने प्रत्यक्ष गोळीबार केल्याचे, तर आरोपी क्रमांक २ (वय ३३) हा त्याचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपी माहिम दर्गा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून १३ मे रोजी मध्यरात्री त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल, मोटारसायकल आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-३ करत आहे.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon