२००८ आंदोलनप्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर; “माझा घटनेशी संबंध नाही,” न्यायालयात स्पष्टीकरण

२००८ आंदोलनप्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर; “माझा घटनेशी संबंध नाही,” न्यायालयात स्पष्टीकरण

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे : २००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीयांना मारहाण झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे बुधवारी ठाणे न्यायालयात हजर झाले. यावेळी न्यायालयाने त्यांचा जबाब नोंदवला असून न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे यांनी थोडक्यात उत्तरे दिली.

सुनावणीदरम्यान न्यायालयात न्यायमूर्ती आणि राज ठाकरे यांच्यात अल्प संवाद झाला. न्यायमूर्तींनी सर्वप्रथम त्यांचे नाव व वैयक्तिक माहिती विचारत प्रश्नोत्तरांना सुरुवात केली. एकूण सात प्रश्न विचारण्यात आले असून त्यास राज ठाकरे यांनी शांतपणे उत्तरे दिली.

“या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. घटनेच्या दिवशी मी नाशिकमध्ये होतो, येथे उपस्थित नव्हतो. माझ्यावरील आरोप खोटे आहेत,” असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात २००८ मध्ये झालेल्या आंदोलनावेळी परप्रांतीयांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सध्या ठाणे न्यायालयात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon