पुण्यातील मुंढवा परिसरात एका मित्राकडूनच आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या; अल्पवयीन आरोपी मित्राला अटक

पुण्यातील मुंढवा परिसरात एका मित्राकडूनच आपल्या मित्राची दगडाने ठेचून हत्या; अल्पवयीन आरोपी मित्राला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतच चालली आहे. गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून पोलिसांचा धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. अशाताच पुण्यातील मुंढवा परिसरात एका मित्राने आपल्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपी मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा परिसरात शुक्रवारी मध्य रात्री १२.३९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोकेश ठेंबरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. लोकेश ठेंबरे हा मुंढवा परिसरात घोरपडी इथं राहत होता. तर आरोपी हा अल्पवयीन असून याच भागात राहणार आहे.

घोरपडी गावात भाग्यश्री नगर, बी. टी. कवडे रोडवर मोकळ्या मैदानात लोकेश आणि अल्पवयीन आरोपी हे दोघे दारू प्यायला बसले होते. यावेळी दारूच्या नशेत असताना आरोपीला आईवरून शिवी दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून दोघांमध्ये मारामारी झाली. त्याच वेळी राग अनावर झाल्याने अल्पवयीन आरोपीने दगडाने लोकेशच्या डोक्यात वार करत त्याचा खून केला.

आरडाओरडा ऐकून स्थानिक घटनास्थळी धावून आले. तेव्हा लोकेशचा तोपर्यंत मृत्यू झाला. होता घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. लोकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon