जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत ‘बुक स्ट्रीट’; वाचनप्रेमींसाठी अनोखा उपक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत ‘बुक स्ट्रीट’; वाचनप्रेमींसाठी अनोखा उपक्रम

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीत ‘बुक स्ट्रीट’ हा आगळावेगळा उपक्रम यंदाही आयोजित करण्यात आला आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत हा उपक्रम पार पडणार आहे.

डोंबिवलीत तिसऱ्यांदा आयोजित होत असलेल्या या ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाबद्दल वाचनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध प्रकारची पुस्तके, साहित्यसंपदा आणि वाचन संस्कृतीला चालना देणारे वातावरण यामुळे हा उपक्रम विशेष ठरत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सकाळच्या शांत, प्रसन्न वातावरणात पुस्तकांच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची तसेच वाचनाची आवड जोपासण्याची संधी मिळणार आहे. पुस्तकप्रेमींना एकत्र आणण्याचा आणि नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon