म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मुंबई सदस्यपदी लक्ष्मण साळवे यांची नियुक्ती

म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मुंबई सदस्यपदी लक्ष्मण साळवे यांची नियुक्ती

रवि निषाद / प्रतिनिधी 

मुंबई : म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या मुंबई युनिटच्या सदस्यपदी लक्ष्मण साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्रम व रोजगार मंत्रालयाचे (भारत सरकार) माजी प्रादेशिक संचालक डॉ. सिद्धार्थ मोरे उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, साळवे हे चेंबूर येथील ‘माँ’ रुग्णालयात कार्यरत असून विविध सामाजिक संस्था व संघटनांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. जनसंपर्क कौशल्याबरोबरच ते सेवाभावी कामातही सक्रिय असल्याचे सांगितले जाते. रुग्णालयात संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यासाठी ते पुढाकार घेतात. तसेच, दैनंदिन कामकाज सांभाळत रुग्णांना मदत करण्यासाठीही ते तत्पर असतात.

साळवे यांच्या नियुक्तीमुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon