रस्ता सुरक्षा मोहिमेला नवे बळ; रितेश-जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर

रस्ता सुरक्षा मोहिमेला नवे बळ; रितेश-जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड ॲम्बेसेडर

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘रस्ता सुरक्षा अभियान’ जनजागृती उपक्रमासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा बुधवारी मंत्रालयात पार पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एसटी महामंडळ आणि परिवहन खात्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांचा व्यापक प्रसार करण्यासाठी रितेश-जेनेलिया देशमुख यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon