मसाजच्या आड देहविक्रीचा धंदा; कळंबोलीतगोल्डन किंग सलून अँड स्पावर छापा, दोन महिलांची सुटका

Spread the love

मसाजच्या आड देहविक्रीचा धंदा; कळंबोलीतगोल्डन किंग सलून अँड स्पावर छापा, दोन महिलांची सुटका

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : कळंबोली येथील सेक्टर १६ मधील ‘गोल्डन किंग सलून अँड स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून रॅकेटची खातरजमा केली आणि त्यानंतर छापा टाकत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

तपासादरम्यान, आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून तसेच दबाव टाकून देहविक्रीस भाग पाडत असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon