तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ८ मोबाईल शोधून परत; मानपाडा पोलिसांची कारवाई

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ८ मोबाईल शोधून परत; मानपाडा पोलिसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकूण १ लाख ६७ हजार १४० रुपयांच्या किमतीचे ८ मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले.

गहाळ झालेल्या मोबाईल संदर्भात प्राप्त तक्रारींचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती व विश्लेषणाचा वापर करून संबंधित मोबाईलचा मागोवा घेतला. त्यानुसार विविध ठिकाणांहून मोबाईल हस्तगत करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या तत्पर कामगिरीबद्दल आभार मानले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon