अशोक खरातच्या लेकाला पोलिसांनी घरातून उचललं; पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना

Spread the love

अशोक खरातच्या लेकाला पोलिसांनी घरातून उचललं; पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असून मुलाला एसआयटीने राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे कल्पना खरात यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत.

अशोक खरातसोबत आता त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्या फरार झाल्याची माहिती असून पोलिसही त्यांच्या मागावर आहेत. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आणि अटक करणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे. एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले होते. मात्र पत्नी फरार होती.

एसआयटीने भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेतेले आहे. आता मुलाचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. एसआयटीचे पथक अशोक खरातच्या पत्नीच्या मागावर असून पथकाकडून खरातच्या बंगल्याची झाडाझडती घेण्यात आले. बंगल्याच्या प्रत्येक खोलीत एसआयटीकडून शोध घेण्यात आला. खरातची पत्नी कल्पना खरात सापडली नाही मात्र मुलगा हर्षवर्धन एसआयटीने ताब्यात घेतले आहे.

तेजस्विनी सातपुतेंसह त्यांच्या पथकानं खरातच्या नाशिकमधील घरी जाऊन ही कारवाई केली. खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी पथक गेलं होतं. मात्र खरातची पत्नी फरार असल्यानं ती घरात सापडली नाही. यावेळी एसआयटीच्या पथकानं खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलीस दाखल होण्याअगोदर खरातची पत्नी फरार झाली होती. मात्र पत्नीला टीप कोणी दिली असा सवाल उपस्थित होत आहे.

शिर्डीमध्ये जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातसह त्याची बायको आणि इतर ३ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी मंगळवारी सकाळीच २ जणांना अटक केली होती. पण, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. शिर्डी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon