घाटकोपरमध्ये १९७ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत; पंतनगर पोलिसांची कारवाई

Spread the love

घाटकोपरमध्ये १९७ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत; पंतनगर पोलिसांची कारवाई

रवि निषाद / प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाणे पोलिसांनी गांजासह एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून १९७ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामकृष्ण मुपणार (वय ५८) असे असून, त्याच्याकडून सुमारे ६ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु.र. क्र. ३०९/२०२६ नोंद करण्यात आली असून, त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act १९८५) अंतर्गत कलम ८(क) व २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार पथक गस्त घालत असताना संशयित हालचालींवरून आरोपीची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला गांजा आढळून आला. दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून, इ-साक्ष अ‍ॅपद्वारे त्याची नोंद घेण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक जयवंत पवार यांच्या पथकासह पोलीस कर्मचारी लांडगे, गवळी आणि राजभोज यांनी सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस उपआयुक्त, झोन ७ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार आणि पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या देखरेखीखाली पार पडली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून परिसरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon