पालघर परिसरात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

पालघर परिसरात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्व विक्रमगड येथील राहणार आहेत.

रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon