‘खाकी स्वॅग’ला ब्रेक; वर्दीत व्हिडीओ पोस्टिंगवर मुंबई पोलिसांची बंदी

Spread the love

‘खाकी स्वॅग’ला ब्रेक; वर्दीत व्हिडीओ पोस्टिंगवर मुंबई पोलिसांची बंदी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : मुंबई पोलीस दलाने वर्दीत असताना सोशल मीडियावर रील्स, मिनी-व्लॉग्स किंवा अन्य व्हिडीओ पोस्ट करण्यास तात्काळ बंदी घातली आहे. शहरातील सुमारे ५१ हजार पोलिस कर्मचाऱ्यांवर हा निर्णय लागू होणार आहे.

सोशल मीडियावर वाढलेल्या ‘खाकी स्वॅग’ ट्रेंडमुळे गोपनीयता व ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब लक्षात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष शाखेचे डीसीपी दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात वर्दीतले कोणतेही व्हिडीओ अपलोड न करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणार आहे. २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेला हा आदेश तात्काळ लागू झाला असून, यामुळे ‘खाकी स्वॅग’चा ट्रेंड थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon