सहलीला निघालेली एसटी बस डिव्हायडरला धडक देत पलटली; पुण्यातील १५ विद्यार्थी जखमी

Spread the love

सहलीला निघालेली एसटी बस डिव्हायडरला धडक देत पलटली; पुण्यातील १५ विद्यार्थी जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर ओतूर परिसरात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुमारे १० ते १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ५३ विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री येथे सहलीसाठी येत होते.दरम्यान, ओतूरजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon