हुतात्मा दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयात वीर हुतात्म्यांना आदरांजली
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : आज हुतात्मा दिन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्याचे अमूल्य वरदान लाभले आहे.
हुतात्मा दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात सर्व पोलीस अधिकारी व अमलदार, तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येत मौन पाळून वीर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
देशाच्या सार्वभौमत्वासाठी व सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे स्मरण सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.