ठाकरेंचा मुंबईसाठी विशेष जाहीरनामा!

Spread the love

ठाकरेंचा मुंबईसाठी विशेष जाहीरनामा!

घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी;७०० स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना लाख रु सहाय्यता निधी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंचच उंच इमारती उभारल्या आहेत.

शिवसेना-मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे शुक्रवारी दादरमधील शिवसेना भवनमध्ये आले होते, येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. आम्ही यांच्यासारखं निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करत नाहीये. आपली सत्ता आल्यावर आपण हे करू, कोळी महिलांसाठी सुद्धा हे आपण करणार आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून १० रुपयात जेवण दिले जाणार आहे.

७०० स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ,घरकाम करणाऱ्या महिलांना १५०० रुपये, कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून १० रुपयात जेवण
तरुणांना लाख रु पर्यंत रोजगार सहाय्यता निधी,बेस्ट बसचे तिकीट कमी करून ५-१० १५-२० रुपये फ्लॅट रेट करणार,प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर आणि पालिकेच्या शाळामध्ये ज्युनिअर कॉलेज सुरु करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon