शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या; आरोपी घटनास्थळावरून फरार

Spread the love

शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या; आरोपी घटनास्थळावरून फरार

योगेश पांडे / वार्ताहर

रायगड – रायगडच्या खोपोलीतुन एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी ७ वाजता निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रसंगी हल्लेखोरांना घटनास्थळाजवळ असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिले असता हे हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिलीय. मात्र मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

घटनेची माहितीमिळताच खोपोली पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरु केला असून अधिक तपास केला जात आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे, याबाबतीत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाढवळ्या हत्येच्या घटनेनं खोपोली शहर हादरले आहे. तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांना हल्ला चढवत निर्घृणपणे संपवलंय. हल्लेखोर हे एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर हादरले आहे. मात्र या हल्ल्यामागे नेमकं कारण काय? हा हल्ला कुणी केला, या बाबत तपशील अद्याप कळू शकलेला नाही. त्यामुळे हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon