पुण्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोंदवलेल्या एका चोरीच्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.सुनील मल्हारी तलवारे, शिवानंद दशरथ मोची असं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून पुणे शहरासह महाड आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींवर घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.अटक आरोपींकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.पुणे शहरासह महाड आणि रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींवर घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.