विष्णूनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी: CEIR पोर्टलच्या मदतीने ₹४ लाखांचे २६ गहाळ मोबाईल मालकांना परत

Spread the love

विष्णूनगर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी: CEIR पोर्टलच्या मदतीने ₹४ लाखांचे २६ गहाळ मोबाईल मालकांना परत

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या CEIR (Central Equipment Identity Register) शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत गहाळ आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश मिळवले आहे. CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करत विविध कंपन्यांचे तब्बल ₹४,००,००० किमतीचे २६ मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे मिळालेल्या सर्व मोबाईल फोनची खातरजमा करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी CEIR प्रणालीने दिलेली मदत, पोलिसांची तांत्रिक जाण व सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे ही कारवाई शक्य झाली. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांकडून विष्णूनगर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल गहाळ झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी व CEIR पोर्टलवर माहिती दिल्यास शोध प्रक्रिया जलद होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon