वंदे मातरम् @१५० : ठाणे पोलिसांकडून शाळांमध्ये सामूहिक गायन उपक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षांची गौरवशाली परंपरा पूर्ण होत असताना ठाणे पोलिसांनी एक अनोखी राष्ट्रभावना जागवणारी पुढाकार राबवला. ठाणे पोलिसांच्या बँड पथकासह शहरातील विविध शाळांमध्ये “वंदे मातरम्” चे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एकता, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि संविधानिक मूल्यांची जाणीव दृढ करणे हा होता. पोलिस बँडच्या सुरेल सादरीकरणाने विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना उसळली.
ठाणे पोलिसांचे हे पाऊल राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या महत्त्वपूर्ण पर्वाचे औचित्य साधत तरुण पिढीला राष्ट्राभिमानाची प्रेरणादायी जोड देणारे ठरले.