नेमबाजीत पो. हवा प्रसाद धमापूरकर यांची सुवर्ण व रौप्य झळाळी

Spread the love

नेमबाजीत पो. हवा प्रसाद धमापूरकर यांची सुवर्ण व रौप्य झळाळी

राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश; पोलीस दलाचा अभिमान वाढवला

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : पोलीस दलातील नेमबाज पोलीस हवालदार प्रसाद धमापूरकर यांनी नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. त्यांनी १२ वी वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून, ३४ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवून राज्याचा आणि पोलीस दलाचा नावलौकिक वाढवला आहे.

धमापूरकर यांच्या या घवघवीत यशाबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी तसेच क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेबरोबरच क्रीडाक्षेत्रातील निष्ठावान योगदानाचे हे यश द्योतक असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon