मिरा-भाईंदरकरांचे तब्बल चौदा वर्षांच्यावनवास संपला.दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण, डिसेंबर अखेरपर्यंत सेवा सुरू

Spread the love

मिरा-भाईंदरकरांचे तब्बल चौदा वर्षांच्यावनवास संपला.दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण, डिसेंबर अखेरपर्यंत सेवा सुरू

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – तब्बल चौदा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदरच्या रहिवाशांना अखेर मेट्रोची जोडणी मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी याबद्दल एक मोठा अपडेट दिली आहे. मिरा रोडमधील दहिसर ते काशिमिरा दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेचे काम पू्र्ण झाले असून, लवकरच ती प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

बुधवारी त्यांनी माहा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून, दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गेची चाचणी केली. यावेळी मेट्रोचे काम पूर्ण झाले असून डिसेंबरच्या अखेर पर्यंत सुरू होणार आहे. सरनाईक यांनी सांगितले की दहिसर–काशिमिरा मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांकडून (CMRS) प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. हे मंजुरीपत्र मिळाल्यानंतर राज्य सरकार उद्घाटनाची पुढील प्रक्रिया ठरवणार आहे. “डिसेंबरच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा आहे,” असे मंत्री म्हणाले.

आपल्या जुन्या आश्‍वासनाची आठवण करून देत सरनाईक म्हणाले, “२००९ मध्ये जेव्हा मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो, तेव्हा मी नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. त्या वेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या घोषणेची खिल्ली उडवली होती. पण १४ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.” “हा मार्ग सुरू झाल्यावर मिरा-भाईंदरचे रहिवासी थेट अंधेरीपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकतील,” असेही त्यांनी सांगितले. सरनाईक पुढे म्हणाले की प्रवासी तिथून मेट्रो लाईन १ चा वापर करून विमानतळ मार्गे थेट कोलाबाही गाठू शकतील.

ही मेट्रोसेवा सुरू झाल्यावर नवीन वर्षात मिरा-भायंदरच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय आणि दक्षिण मुंबईतील विधान भवनाशी सुलभ मेट्रो जोडणी मिळणार आहे. तसेच २०२६ पर्यंत दहिसर-काशिमिरा मेट्रो लाईनचा विस्तार नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यंत केला जाणार आहे. त्यानंतर वसई-विरार मेट्रो मार्गिकेचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon