जादूटोण्याची भीती दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर तब्बल १४ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत ५० लाखांची फसवणूक; भोंदूबाबा फरार

Spread the love

जादूटोण्याची भीती दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर तब्बल १४ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत ५० लाखांची फसवणूक; भोंदूबाबा फरार

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुझ्या घरातील कुणाचा तरी बळी जाईल”, अशी धमकी देऊन भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. जादूटोण्याची भीती दाखवत हा भोंदूबाब गेल्या १४ वर्षांपासून या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाने महिलेच्या कुटुंबियांची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अजून काही महिला समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप असे या भोंदू बाबाचे नाव आहे.

जादूटोण्याची भीती दाखवत हा भोंदूबाबा महिलेवर गेल्या १४ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचारासह ५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ॲट्रॉसिटीसह विविध कलमाद्वारे करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तू मला आवडते तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” असे सांगत महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. त्याच्याकडील पुस्तकात पतीसह मुलांची नावे लिहिली आहेत जर माझ्यासोबत संबंध ठेवला नाही तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल अशी जादूटोण्याची भीती दाखवत २०१० पासून आतापर्यंत अनेक वेळा या भोंदूबाबाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप (४७) या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण नेहमीप्रमाणे अगोदरच या भोंदूबाबाला लागली. मग त्याने पळ काढला. पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही तोच आरोपीला त्याची कशी माहिती होते असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. आता भोंदूबाबा फरार असून पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी रवाना झाले आहे. त्याला लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon