अंबरनाथ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांच्या हाती, नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ – अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षम तपास पथकाने हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि प्रयत्नांमुळे तब्बल ₹९,४५,००० किमतीचे एकूण ४५ मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले.
यासाठी आयोजित मोबाईल हस्तांतरण समारंभात पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोबाईल परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत अंबरनाथ पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे आणि नागरिक सेवेसाठीच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे.