मुंबईजवळील ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; १४ कोटींचा साठा जप्त, दुबईसोबत मोठं कनेक्शन उघड

Spread the love

मुंबईजवळील ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; १४ कोटींचा साठा जप्त, दुबईसोबत मोठं कनेक्शन उघड

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून केलेल्या धडक कारवाईत एका ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. पेल्हार येथील रशीद कंपाउंडमध्ये राजरोसपणे एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे याचा मास्टर माईंड दुबईतून एमडी ड्रग्स फॅक्टरी ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा हात आहे का ? याचा तपास केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी टिळकनगर पोलीस ठाण्यात एक ड्रग्स संदर्भात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पाळंमुळं शोधत असताना या कारखान्याबाबत माहिती मिळाली. सात किलोपेक्षा जास्त ड्रग्सचा साठा सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षात याची किंमत जवळपास १४ कोटींची असल्याचं सांगितलं जात आहे.

या कारखान्यापासून जवळच पोलीस स्टेशन आहे. अशाही परिस्थितीत येथे ड्रग्स फॅक्टरी सुरू होती. काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या कामन या गावात ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता पेल्हार येथील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon