मुंब्रा पोलिसांची भाऊबीजला नागरिकांना खास भेट; ४० हरविलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन!
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा : भाऊबीजच्या दिवशी मुंब्रा पोलिसांनी नागरिकांना एक खास भेट दिली. मुंब्रा पोलीस ठाण्याने चालू वर्षात तसेच मागील वर्षात हरविलेले ४० मोबाईल फोन शोधून काढून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत ₹८,२७,२००/- एवढी आहे.
या उल्लेखनीय कामगिरीत पोलीस शिपाई सागर महांगडे, महेश जाधव आणि पोलीस नाईक माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले मोबाईल ट्रेस करून नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
हा विशेष कार्यक्रम मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरविलेला मोबाईल शोधण्यासाठी तात्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.