महाराष्ट्रात सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रत्नागिरी, नाशिक, जळगाव, पुणे जिल्ह्यांतील प्रशासनात फेरबदल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय कोलटे यांची पुणे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने ही बदली यादी मंगळवारी जारी केली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
१)देवेंद्र सिंह, जे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
२)शेखर सिंह, सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, यांची बदली कुंभमेळा आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली आहे.
३)जलज शर्मा, जे नाशिकचे जिल्हाधिकारी होते, यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून झाली आहे.
४)जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
५)ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुघे यांची नियुक्ती जळगाव जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
६)मनोज जिंदल , जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक होते, यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.