१० महिन्यांनंतर मोक्काचा फरार आरोपी देवनार पोलिसांच्या जाळ्यात
रवि निषाद / मुंबई
मुंबई – देवनार पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस तब्बल १० महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इस्माइल इब्राहिम शेख (वय ३५) असे असून, पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१/२०२५ नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात कलम ३०८(४), ६१(१), १०९, ११८, ११८(२), ११५(२), १८९(४)(१)(२)(३) भा.दं.वि. तसेच कलम ३७(१) व १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात इस्माइल इब्राहिम शेख हा पाहिजे आरोपी म्हणून पोलिसांना हवा होता.
परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त श्री. समीर शेख, अपर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, तसेच सहायक पोलिस आयुक्त आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. देवनार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलिस निरीक्षक विजयकुमार अंगरगे, पोलिस उपनिरीक्षक राजू साळुंखे आणि पोलिस शिपाई अभिजीत करवडे यांनी उत्कृष्ट माहिती गोळा करून आणि गुप्त तपासाद्वारे आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
या कारवाईमुळे देवनार पोलिस ठाण्याच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या या धाडसी व तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.