शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारकडून ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

Spread the love

शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारकडून ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या या आक्रोशानंतर अखेर राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ३२ हजार कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली.

या पॅकेजनुसार, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, घरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी, तसेच जनावरांच्या नुकसानाची भरपाई देण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ही मदत केवळ आकड्यांची नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे.”

🔹 पॅकेजमधील प्रमुख मुद्दे :

जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹४७,००० नुकसान भरपाई

तत्काळ मदत म्हणून ₹१०,००० रोख आणि गहू-तांदूळ वितरण

पीक नुकसानभरपाई:

कोरडवाहू शेतीसाठी ₹३५,००० प्रति हेक्टरी

बागायती शेतीसाठी ₹३२,००० प्रति हेक्टरी

हंगामी बागायतीसाठी ₹२७,००० प्रति हेक्टरी

रब्बी पीक घेण्यासाठी ₹१०,००० प्रति हेक्टरी

विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना ₹५०,००० पेक्षा जास्त मदत

जनावरांसाठी मदत:

दुधाळ जनावरांसाठी ₹३७,००० पर्यंत मदत

कुक्कुटपालनासाठी ₹१०० प्रति कोंबडी

गाळ भरलेल्या विहिरींसाठी ₹३०,०००

घरांसाठी मदत:

पडझड झालेल्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद

डोंगरी भागातील घरांना अधिक ₹१०,०००

झोपड्या, गोठे, दुकानदार यांना ₹५०,००० पर्यंत मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “एनडीआरएफचे निकष काही प्रमाणात शिथिल केले आहेत. दोन हेक्टरपर्यंत केंद्र सरकारचे नियम असतात, त्यावरील भार राज्य सरकार उचलणार आहे. कुणीही वंचित राहू नये म्हणून प्रत्येक घटकाचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.”

या निर्णयामुळे अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेने हे पॅकेज मोलाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon